नवी दिल्ली : भारतातील मोस्ट वॉन्टेड दाऊद इब्राहिम याच्या पत्नीशी संपर्क झाल्याचा दावा 'टाईम्स' या वृत्तसमूहानं केलाय.
पाकिस्तानातील कराचीमध्ये असलेल्या दाऊदच्या घरी फोन करण्यात आला होता. एका पत्रकारानं जेव्हा दाऊदच्या घरी फोन केला तेव्हा तो फोन दाऊदची पत्नी महजबीन शेख हिनं उचलला.
अधिक वाचा : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम पाकिस्तानातच, पुरावा हाती
अधिक वाचा : दाऊदच्या कुटुंबीयांच्या आणि साथीदारांच्या दुबई-पाकिस्तान वाऱ्या
यावेळी, काय झाली बातचीत...
महजबीन शेख : हलो, अस्सलाम आलेकुम
पत्रकार : मी मेहजबीन शेख यांच्याशी बोलतोय का?
महजबीन शेख : होय
पत्रकार : तुम्ही कराचीतून बोलताय का?
महजबीन शेख : होय
पत्रकार : मला फक्त एव्हढचं विचारायचंय की तुम्ही दाऊद इब्राहीमच्या पत्नी बोलत आहात का?
महजबीन शेख : होय... ते झोपले आहेत
यानंतर संपर्क तुटतो... पण, या फोनमुळे दाऊद इब्राहिम पाकिस्तानातच असल्याचं पुन्हा एकदा उघड झालंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.