जम्मू : सीमा सुरक्षा दलानं (बीएसएफ) एक धक्कादायक माहिती उघड केलीय. 'जमात उद दावा' या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या हाफिज सईद भारताच्या सीमेलगत असणाऱ्या क्षेत्रात भेटी देत असल्याचं बीएसएफनं म्हटलंय.
अधिक वाचा - २६/११ला सात वर्ष उलटली; पुन्हा हल्ल्याची शक्यता
या क्षेत्रातील दहशतवादी संघटनांशी संधान साधत दहशतवाद्यांना भारतावर हल्ला करण्यासाठी हाफिज भडकावत असल्याचं समजतंय. मोस्ट वॉन्टेज हाफिज सईद हा मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड आहे. पाकिस्तानी सुरक्षा दलाचीही त्याला फूस असल्याचं समजतंय.
अधिक वाचा - 'बुलेट प्रुफ' व्यवस्था मंत्र्यांसाठी तात्काळ... पोलिसांची सुरक्षा वाऱ्यावर!
जम्मू सीमांत क्षेत्रातील बीएसएफचे महानिरीक्षक राकेश शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानचं सुरक्षा दलही सईदला या दहशतवादी कारवायांसाठी पाठिंबा देतंय... आणि म्हणूनच तो इतका खुलेआम या भागांत फिरू शकतोय.
अधिक वाचा - २६/११ च्या मुंबई हल्ल्याची पहिली रात्र
सीमेपलिकडून होणाऱ्या दहशतवादी कारवाया वाढल्यात का? या प्रश्नावर उत्तर देताना, शर्मा यांनी पाकिस्तानकडून दहशतवादाला खतपाणी घातलं जातंय याला दुजोरा दिलाय. हाफिज सईद भडकाऊ भाषणांनी सियालकोट आणि आजुबाजुच्या परिसरात दहशतवाद पसरवण्याचं काम करत असल्याचंही त्यांनी म्हटलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.