लंडन : बातमी केट मिडल्टनच्या आजेसासूची... अर्थात क्वीन एलिझाबेथची...
एलिझाबेथ यांनी आपल्या पती फिलीपला लिहीलेल्या काही 'लव्ह लेटर'चा लवकरच लिलाव करण्यात येणार आहे. २४ एप्रिलला लंडनमध्ये हा कार्यक्रम होणार आहे. क्वीन एलिझाबेथ २१ वर्षांची असताना तिनं फिलीपला हे लव्ह लेटर लिहीलं होतं...
तिच्या आणि फिलीपच्या अफेअरबद्दल एलिझाबेथनं तिच्या एका मैत्रिणीला पत्र पाठवलं होतं. या पत्रात तिनं फिलीप आणि ती कसे भेटले, त्यांचं लग्न कसं ठरलं, याबद्दल सविस्तर लिहीलंय. याच पत्राचा लिलाव करण्यात येणार आहे.
विल्टशायरच्या चिपनहॅम सभागृहात हा सोहळा होणार आहे. साधारणपणे १ लाख २० हजारांपासून या 'लव्ह लेटर'साठी बोली सुरू होणार आहे.