कीव: युक्रेनची एक महिला राजकीय नेत्यानं आपल्या न्यूड फोटोंबाबत अभिमान व्यक्त केलाय, जे फोटो सध्या लीक झालेत आणि ऑनलाइन मीडियामध्ये पसरले आहेत. युक्रेनची ३० वर्षीय महिला नेता लियुलचकनं आपल्या लीक झालेल्या न्यूड फोटोंबाबत लाज वाटून घेण्याऐवजी त्यातील सौंदर्य सांगतेय.
लियुलचकनं म्हटलं, “न्यूड फोटो कलेनं परिपूर्ण असतात, ज्यावर टीका करू नये आणि यात काहीच चुकीचं नाहीय. जे लोकं यात तज्ज्ञ असतात ते या आर्टला सौंदर्याच्या दृष्टीनं पाहतात. माझ्या वयाची आणि जमान्यातली महिला जेव्हा असं करते, तेव्हा तिच्यावर टीका होते, तिला अश्लील म्हटलं जातं. पण मी याला अजिबात अश्लील समजत नाही."
मिळालेल्या माहितीनुसार गेल्या काही दिवसांपासून ज्या हॅकर्सच्या ग्रृपनं हॉलिवूडच्या १०० सेलिब्रिटींचे खाजगी फोटो लीक केले आहेत. त्यात या महिला नेत्याचा पण समावेश होता. इंटरनेटच्या दुनियेत आय-क्लाउड हॅकिंग याला संबोधलं जातं. यात खूप खाजगी आणि काही विशेष क्षणांचे फोटो चोरले जातात.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.