भारताला टक्कर देण्यासाठी चीनचं 'मेड इन चायना' कॅम्पेन

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारताला उद्योग क्षेत्रात सक्षम बनवण्यासाठी सरकारची महत्त्वकांक्षी योजना ‘मेक इन इंडिया’चा शुभारंभ गुरुवारी केला. याचाच, धसका घेतलेल्या चीननं भारताच्या या अभिनाच्या धर्तीवर ‘मेड इन चायना’ कॅम्पेन लॉन्च केलंय.

Updated: Sep 25, 2014, 05:13 PM IST
भारताला टक्कर देण्यासाठी चीनचं 'मेड इन चायना' कॅम्पेन title=

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारताला उद्योग क्षेत्रात सक्षम बनवण्यासाठी सरकारची महत्त्वकांक्षी योजना ‘मेक इन इंडिया’चा शुभारंभ गुरुवारी केला. याचाच, धसका घेतलेल्या चीननं भारताच्या या अभिनाच्या धर्तीवर ‘मेड इन चायना’ कॅम्पेन लॉन्च केलंय.

‘मेक इन इंडिया’ची भारतानं सुरुवात केल्यानंतर चीननं लगेचच आपलं हे नवीन कॅम्पेन सुरू केलंय... त्यामुळे चीनची चिंता स्पष्टपणे दिसून येतेय. चीन सरकारनं आपल्या देशातील मॅन्युफॅक्टरिंगच्या ताकदीला आणखीन वाढविण्यासाठी ‘मेड इन चायना’ कॅम्पेन लॉन्च केलंय. 

या कॅप्मेननुसार, चीन सरकार आता टॅक्समध्ये अनेक सूट देणार आहे. याशिवाय उद्योजकांना चीन सरकारकडून इतर सुविधाही मिळतील. त्यामुळे, उद्योगधंद्यांना देशात आणखीन वाव मिळेल, असा चीनच्या सरकारचा प्रयत्न आहे. 

चीन सरकारनं ‘मेड इन चायना’मधून देशातील उत्पादनांना विकसित करण्यासाठी हायटेक आयात तसंच रिसर्च अँन्ड डेव्हलपमेंटला वाव देण्याचा प्रयत्न केलाय. चीनी सरकारकडून टॅक्समध्ये सूट मिळाल्यानंतर उत्पादक कंपन्या रिसर्च अँन्ड डेव्हलपमेंटमध्ये गुंतवणूक करतील. जागतिक स्तरावर देशाची अर्थव्यवस्था मजबूत राहावी, यासाठी चीनचं हे 
कॅम्पेन आहे.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.