भारताला स्पेशल पार्टनरचा दर्जा, अमेरिकन संसदेत मांडलं विधेयक

अमेरिकेच्या खासदारांनी भारताला अमेरिकेच्या स्पेशल ग्लोबल पार्टनरचा दर्जा मिळावा आणि दोन्ही देशामधील भागीदारी वाढावी तसेच संरक्षण आणि द्विपक्षीय सहकार्य वाढवण्यासाठी अमेरिकेच्या संसदेत एक विधेयक मांडलं आहे.

Updated: Jun 9, 2016, 01:00 PM IST
भारताला स्पेशल पार्टनरचा दर्जा, अमेरिकन संसदेत मांडलं विधेयक title=
Photo credit : whitehouse.gov

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या खासदारांनी भारताला अमेरिकेच्या स्पेशल ग्लोबल पार्टनरचा दर्जा मिळावा आणि दोन्ही देशामधील भागीदारी वाढावी तसेच संरक्षण आणि द्विपक्षीय सहकार्य वाढवण्यासाठी अमेरिकेच्या संसदेत एक विधेयक मांडलं आहे.

अमेरिकन संसदेच्या परराष्ट्र धोरणांशी संबंधित समितीचे वरिष्ठ सदस्य इलियट एंजेल आणि संसदेतील भारताचे समर्थक आणि डेमोक्रेटिक नेता जो क्राउली यांनी भारताला स्पेशल ग्लोबल पार्टनरशिप विथ इंडिया अॅक्ट २०१६ नुसार विधेयक मांडलं आहे. या विधेयकानुसार शस्त्र निर्यात नियंत्रण नियमांचा अभ्यास केला जाईल आणि त्यानंतर अमेरिकेच्या राष्ट्रपतींना भारताला अमेरिकेचा स्पेशल पार्टनर करण्याची परवानगी मिळणार आहे.