अमेरिकन राष्ट्राध्यक्ष निवडणूक, डोनाल्ड ट्रम्प यांची अधिकृत घोषणा

अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.

PTI | Updated: Jul 20, 2016, 11:22 AM IST
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष निवडणूक, डोनाल्ड ट्रम्प यांची अधिकृत घोषणा title=
छाया : AP

वॉशिंग्टन : अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.

येत्या नोव्हेंबरमध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक होत आहे. त्यात डेमोक्रॅटिक पक्षाच्या हिलरी क्लिंटन यांना डॉनाल्ड ट्रम्प यांचे आव्हान आहे.  ट्रम्प हे अमेरिकेतले रिअल इस्टेट मोठे बिझनेसमन आहेत. 

गेल्यावर्षी ट्रम्प राजकारणात उतरलेल्या ट्रम्प यांनी एकूण १७ जणांना राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीच्या शर्यतीत मागे टाकले आहे. ट्रम्प यांना संपूर्ण देशातून एकूण एक हजार ७२५ मतं मिळाल्याचं पक्षाच्या राष्ट्रीय कनव्हेशनमध्ये जाहीर करण्यात आले आहे.

रिपब्लिकन पक्षाने दाखवलेला विश्वास हा माझा सन्मान असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. येत्या ८ नोव्हेंबरला होणाऱ्या अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाच्या मतदानाच्या प्रक्रियेत आता ट्रम्प आणि क्लिंटन असा थेट सामना बघायला मिळणार आहे.