कोराट : थायलंडमधील कोराटच्या खाओ याई नॅशनल पार्कमध्ये एका मोटरसायकल स्वारावर हत्तीने हल्ला केला. या मोटरसायकल स्वारासमोर एक नाही दोन नाही तर सहा हत्ती रागाने उभे होते.
ही घटना कारच्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे, या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ बातमीच्या सर्वात खाली देण्यात आला आहे.
एक मोटरसायकलस्वार नॅशनल पार्कमधून निघाला होता, तेव्हा रस्त्यावरून काही हत्ती जात होते. मोटरसायकलस्वाराने हत्तींमधून रस्ता काढण्याचा प्रयत्न केला, पण हत्तींना ते आवडलं नसावं, यानंतर एक हत्ती बाईकस्वारच्या दिशेने धावून आला, त्यानंतर हत्तीने चित्कार सुरू केले, हा चित्कार ऐकून एकामागून एक असे सहा हत्ती जमा झाले.
मोटरसायकलस्वार आपल्या मोटरसायकवरून खाली पडला. रस्त्याच्या बाजूला उभा राहून त्या या सर्व चित्कार भरणाऱ्या हत्तींसमोर हात जोडून उभा होता.
हा थरार १० मिनिटांपासून सुरू होता. सुदैवाने एकाही हत्तीने या मोटरसायकल स्वारावर हल्ला केला नाही. मात्र थायलंडच्या खाओ याई नॅशनल पार्कमध्ये यापुढे सावध राहण्याच्या सूचना दिल्या आहेत, हा रस्ता वाहतुकीसाठी बंद केला जाण्याची शक्यता आहे.
पाहा मोटरसायकल स्वारावर सहा हत्तींनी कसा हल्ला केला?
हत्तीचा मान राखला, तर तो तुमचा सन्मान करतो
या हत्तीला हटवण्याचं धाडस कोण करू शकतं?
मोटरसायकलस्वार आणि हत्तीचं वावडं
मोटरसायकल स्वाराची अशी तारांबळ पाहिली आहे का?
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.