www.24taas.com, झी मीडिया, बर्लिन
जर्मनीमधील फैशन डिझायनर कार्ल लेगरफेल्ड प्रेमात पडले आहेत. त्यांना लग्नही करण्याची इच्छा आहे. पण आश्चर्य म्हणजे लेगरफेल्ड हे कुठल्याही स्त्रीच्या प्रेमात पडले नसून ते पडले आहेत पांढऱ्या गुबगुबीत सयामी मांजरीच्या प्रेमात. त्यांना याच मांजरीशी लग्नंही करायचं आहे. या मांजरीचं नाव ‘चोपेट’ असं आहे.
जगात विविध प्रकारची लग्नं होत असतात. जागतिकीकरणाच्या काळात आंतरजातीय, आंतरधर्मिय, आंतरराष्ट्रीय विवाह या अत्यंत सामान्य गोष्टी बनल्या आहेत. आता तर समलैंगिक विवाहांवरही वाद सुरू झाले आहेत. अशात जर्मनीमध्ये फॅशन डिझायनर कार्ल लेगरफेल्ड यांना आपल्या मांजरीशी लग्न करण्याची इच्छा आहे.
“माणूस आणि जनावरांची लग्नं होत नाहीत. मलाही कधी वाटलं नव्हतं, की मी कधी एका मांजरीच्या इतका प्रेमात पडेन.” असं लेगरफेल्ड यांनी ‘न्यूयॉर्क पोस्टला सांगितलं आहे. लॅगरफेल्ड यांची मांजरही कुठल्या सेलिब्रिटीपेक्षा कमी नाही. या मांजरीचं ट्विटर अकाउंट असून तिचे २७,००० फॉलोअर्स आहेत.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.