अक्षयच्या मुलाचं वडिलांच्या पावलावर पाऊल

बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमारचा मुलगा आरवनं वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवलं आहे.

Updated: May 8, 2016, 10:53 PM IST
अक्षयच्या मुलाचं वडिलांच्या पावलावर पाऊल title=

मुंबई: बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमारचा मुलगा आरवनं वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवलं आहे. आरवनं कुडो या जपानी मार्शल आर्ट स्पोर्टमध्ये ब्लॅक बेल्ट मिळवला आहे. अक्षय कुमार स्वत: मार्शल आर्ट शिकला आहे. 

अक्षय कुमारनं आपल्या 13 वर्षांच्या मुलाचा ब्लॅक बेल्ट घातलेला फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. 9 वर्षांच्या ट्रेनिंगनंतर माझ्या मुलाला कुडो ब्लॅक बेल्टमध्ये पहिली डिग्री मिळाली आहे. माझ्या मुलाचा मला अभिमान आहे, असं ट्विट अक्षयनं केलं आहे. 

 

तर आरवला मिळालेली ब्लॅक बेल्टची डिग्री हे माझ्यासाठी मदर्स डेचं सगळ्यात मोठं गिफ्ट आहे, अशी प्रतिक्रिया ट्विंकल खन्नानं दिली आहे.