बॉलीवूडचा खिलाडी चला हवा येऊ द्याच्या मंचावर

अभिनेता शाहरुख खान, सलमान खान आणि इरफान खान यांच्यानंतर आता खिलाडी अक्षय कुमारही ‘चला हवा येऊ द्या’च्या रंगमंचावर अवतरणार आहे. 

Updated: Jul 23, 2016, 08:59 AM IST
बॉलीवूडचा खिलाडी चला हवा येऊ द्याच्या मंचावर title=

मुंबई : अभिनेता शाहरुख खान, सलमान खान आणि इरफान खान यांच्यानंतर आता खिलाडी अक्षय कुमारही ‘चला हवा येऊ द्या’च्या रंगमंचावर अवतरणार आहे. 

आगामी रुस्तम सिनेमाच्या निमित्ताने अक्षयने ‘चला हवा येऊ द्या’ या शोमध्ये हजेरी लावलीये. नुकतंच या शोचं शूटिंग पार पडलंय. 

‘चला हवा येऊ द्या’मध्ये आतापर्यंत शाहरुख खान, सोनम कपूर, जॉन अब्राहम, विद्या बालन यासारख्या बॉलिवूड स्टार्सनी हजेरी लावल्याने आता बॉलिवूड स्टार्सचा ओढा आता या शोकडे वाढू लागलाय.