अनुराग कश्यपचा आणखी एक चित्रपट सेन्सॉरच्या कच्याट्यात

'उडता पंजाब'नंतर आता अनुराग कश्यपचा आणखी एक चित्रपट सेन्सॉरच्या कचाट्यात सापडला आहे. अनुराग कश्यप निर्मित 'हरामखोर' चित्रपटाला प्रमाणपत्र द्यायला सेन्सॉर बोर्डाने नकार दिला आहे. यामुळे आता अनुराग फिल्म सर्टीफिकेशन न्यायाधिकरणाकडे दाद मागण्याचा विचार करत आहे. 

Updated: Jun 19, 2016, 04:48 PM IST
अनुराग कश्यपचा आणखी एक चित्रपट सेन्सॉरच्या कच्याट्यात title=

मुंबई : 'उडता पंजाब'नंतर आता अनुराग कश्यपचा आणखी एक चित्रपट सेन्सॉरच्या कचाट्यात सापडला आहे. अनुराग कश्यप निर्मित 'हरामखोर' चित्रपटाला प्रमाणपत्र द्यायला सेन्सॉर बोर्डाने नकार दिला आहे. यामुळे आता अनुराग फिल्म सर्टीफिकेशन न्यायाधिकरणाकडे दाद मागण्याचा विचार करत आहे. 

का अडकला सेन्सॉरच्या कचाट्यात

या चित्रपटात बॉलिवूडचा आघाडीचा अभिनेता नवाझउद्दीन सिदिक्की आणि श्वेता त्रिपाठी हे प्रमुख भूमिकेत असणार आहेत. सेन्सॉरने चित्रपटाच्या कथेवर आक्षेप घेतला आहे. चित्रपटामध्ये एका किशोरवयीन विद्यार्थिनीमधील आणि तिच्या शिक्षकासोबतची लव्ह स्टोरी आहे.
 
आपल्या समाजात शिक्षकाला आदराचे स्थान आहे अशावेळी चित्रपटात विद्यार्थिनी आणि शिक्षकामध्ये संबंध दाखवणे गैर आहे असे सेन्सॉर बोर्डचे म्हणणे आहे. श्लोक शर्माने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. हरामखोर हा चित्रपट जियो मामी फिल्म फेस्टिव्हलमध्ये पुरस्काराचा मानकरी ठरला होता.