मुंबई: मद्यधुंद अवस्थेत बेदरकारपणे गाडी चालवणाऱ्या अभिनेता सलमान खाननं या घटनेचा साक्षीदार असलेला गायक कमाल खानला साक्षीदार बनवण्याची मागणी केली आहे. सलमानची ही मागणी हायकोर्टानं मान्य केल्यास या प्रकरणाला नवं वळण मिळ्याची शक्यता आहे.
आणखी वाचा - अखेर, कतरिनानं सलमानला टाळायचं कारण सांगितलंच!
सत्र न्यायलयाच्या निकालाला सलमाननं हाय कोर्टात दाद मागितली आहे. सोमवारी सलमानच्या वकीलांनी गायक कमाल खानवला साक्षीदार करण्याची मागणी केली. त्यावर सरकारी वकीलांना उत्तर दाखल करायला सांगितलंय. कमाल घटनेदरम्यान सलमानबरोबर होता. त्यामुळे तो घटनेचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहे.
साक्ष देण्यासाठी तो उपलब्ध असतानाही खटल्यादरम्यान त्याला साक्षीदार म्हणून का तपासण्यात आलं नाही, असा सवाल सलमाननं आपल्या अर्जात विचारलाय.
आणखी वाचा - "प्रेम रतन धन पायो" : शाहरूखचं रेकॉर्ड तोडण्यात सलमान अपयशी
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.