मुंबई: आपली एक्स गर्लफ्रेंड जिया खानच्या मृत्यूप्रकरणी अटक करण्यात आल्यानंतर तब्बल दोन वर्षांनी सूरज पांचोली तिच्याबद्दल बोललाय. मला अजूनही जियाची खूप आठवण येते आणि तिचं नाव माझ्यासोबत जोडलं गेल्यानं मला दु:ख नाही, असं तो म्हणाला.
मी आनंदी आहे जियाचं नाव माझ्यासोबत जोडलं जातं
सूरजच्या आयुष्यात त्यावेळी खूप उलथा-पालथ झाली, जेव्हा त्याचं नाव समोर आलं. त्याच्यावर जियाला आत्महत्येसाठी प्रोत्साहित केल्याचा आरोप होता आणि त्याला अटकही झाली. सूरज म्हणतो, माझं नाव नेहमी तिच्यासोबत जोडलं जातं, त्याचा मला अजिबात पश्चाताप नाही. मी दु:खी आहे की, तिनं आपलं आयुष्य संपवलं पण तिचं नाव माझ्यासोबत जोडलं गेलंय याचं मला समाधान आहे.
मी दररोज तिची आठवण काढतो
25 वर्षीय ब्रिटिश-अमेरिकन अभिनेत्री जियानं 2013मध्ये जुहूतील आपल्या घरी पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. सूरजची जियाशी भेट फेसबुकवर झाली आणि काही काळातच त्यांच्यात प्रेमसंबंध जुळले. मी दररोज तिची आठवण काढतो. कारण मी तिच्यावर खूप प्रेम केलंय.
आणखी वाचा- सलमानच्या आवाजातलं गाणं, 'मै हूँ हिरो तेरा'
सूरजनं सांगितलं, ती माझ्यापेक्षा 5 वर्षांनी मोठी होती. माझ्यापेक्षा ती अधिक मॅच्युअर होती. जेव्हा मी 21 वर्षांचा होतो ती 26ची होती. माझ्यापेक्षा जास्त ती फिल्म इंडस्ट्रीला ओळखत होती.
1983मध्ये रिलीज झालेल्या 'हीरो' चित्रपटाच्या रिमेकमध्ये सूरज पांचोली आणि आथिया शेट्टीसोबत दिसणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.