सिनेमा : फॅन्टम
दिग्दर्शक : कबीर खान
निर्माता : साजिद नाडियादवाला, सिद्धार्थ रॉय कपूर
लेखक : कबीर खान
कलाकार : सैफ अली खान, कतरीना कैफ
मुंबई : कबीर खान दिग्दर्शत फॅन्टम हा सिनेमा हुसेन जैदी यांनी लिहीलेल्या कादंबरीवर आधारीत आहे. सैफ अली खान आणि कतरिना कैफ यांची प्रमुख भूमिका या सिनेमात पाहायला मिळतायत.
डी-डे आणि बेबीमध्ये जे तुम्ही पाहिलं असेल तेच याही सिनेमात तुम्हाला पाहायला मिळेल. त्यामुळे काहीतरी वेगळं पाहण्यासाठी तुम्ही जात असाल तर तुमच्यापदरी निराशा पडेल.
भारताविरुद्धच्या दहशतवादी कारवायांविरुद्ध गंभीर पावलं उचलण्याची गरज आहे, असा मॅसेज यातून देण्यात आलाय. २६/११ च्या हल्ल्यातील गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी एक मास्टर प्लान बनवला जातो. यासाठी डॅनियल सिंग या या एक्स ऑफिसरची निवड करण्यात येते. या मिशनमध्ये डॅनियलसोबत नवाझ या एक्स रॉ एजंटची साथ मिळते.
यात डॅनिल सिंगची व्यक्तिरेखा साकारली आहे सैफ अली खाननं तर कतरिनानं नवाझ या एक्स रॉ एजंटची भूमिका बजावली आहे.. हे दोघंही एका महत्त्वाच्या मिशनसाठी निघालेत. मिशन आहे लष्कर ए तोयबाच्या कमांडरचा आणि दहशतवादी मास्टरमाईंडचा अंत...
अभिनेता सैफ अली खानचा अभिनय छान झालाय. खरंतर त्यानं साकारलेल्या या भूमिकेत आपल्याला कधी टॉम क्रुज, तर कधी जॅसन स्तॅथमचे शेड्स पहायला मिळतात. सैफनं साकारलेल्या डॅनियल या व्यक्तिरेखेवर आणखी काम करता आलं असतं पण तसं काही दिसत नाही. त्याच्या भावमुद्रा संपूर्ण सिनेमाभर सारख्याच राहतात. तर दुसरीकडे करतिना कैफ ही संपूर्ण सिनेमात फक्त सुंदर दिसते, तिच्या वाट्याला फारसं काही काम आलेलं नाही. ती नसती तरी या सिनेमाच्या कथेला काही फरक पडला नसता...
अतिशय सुस्त आणि कंटाळवाणा असलेल्या या सिनेमाला आम्ही देतोय २ स्टार्स
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.