...ही होती करीनाच्या आयुष्यातली सर्वात मोठी चूक!

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान आपल्या बॉलिवूड करिअरमध्ये चांगलीच खूश असली तरी एक रुखरुख तिच्या मनाला लागून राहिलीय. 

Updated: Jun 29, 2016, 03:53 PM IST
...ही होती करीनाच्या आयुष्यातली सर्वात मोठी चूक!

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान आपल्या बॉलिवूड करिअरमध्ये चांगलीच खूश असली तरी एक रुखरुख तिच्या मनाला लागून राहिलीय. 

आपण जास्त शिकू शकलो नाही, कॉलेजमध्ये जाऊ शकलो नाही, याची खंत करीनाला वाटतेय. बरं याला जबाबदारही ती स्वत:च आहे. 

कमी वयातच करीनाला अॅक्टिंगचे आणि सिनेमाचे वेध लागले होते... त्यामुळे, तीनं शिक्षणाकडे दुर्लक्ष केलं. पण, याचा पस्तावा तिला आता होतोय. आपल्या आयुष्यातील हा एक चुकीचा निर्णय होता, असं ती म्हणतेय. 

सध्या करीना आपल्या बॉलिवूड करिअरमध्ये खूश आहे... हॉलिवूडमध्ये जाण्याची आपल्याला इच्छा नाही.... आपल्या छोट्याशा जगात आपण सुखी आहोत, असंही करीनानं म्हटलंय.