शाहिद-मीराच्या लग्नावर करीनानं पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया

शाहिद कपूर सध्या त्याच्या आयोजित 'विवाह'मुळे भलताच चर्चेत आहे. दिल्लीच्या मीरा राजपूत हिच्याशी तो विवाहबंधनात लवकरच अडकणार आहे, हे तर एव्हाना सगळ्यांनाच माहीत झालंय. मग, बॉलिवूडच्या 'बेबो'पासून ही गोष्ट कशी लपून राहील.

Updated: Jun 17, 2015, 04:18 PM IST
शाहिद-मीराच्या लग्नावर करीनानं पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया title=

नवी दिल्ली : शाहिद कपूर सध्या त्याच्या आयोजित 'विवाह'मुळे भलताच चर्चेत आहे. दिल्लीच्या मीरा राजपूत हिच्याशी तो विवाहबंधनात लवकरच अडकणार आहे, हे तर एव्हाना सगळ्यांनाच माहीत झालंय. मग, बॉलिवूडच्या 'बेबो'पासून ही गोष्ट कशी लपून राहील.

करीना कपूर आणि शाहिदत कपूर बरीच वर्षे नात्यात राहिल्यानंतर २००७ मध्ये त्यांचं ब्रेक अप झालं होतं. त्यानंतर मात्र करीनानं आपल्या या नात्याबद्दल आणि शाहिदबद्दल बोलणं सतत टाळलं. 

पण, आता मात्र नवाब सैफ अली खानची बेगम असलेल्या करीनानं आपण शाहिद आणि मीराच्या लग्नाच्या बातमीवर खुश असल्याचं सांगितलंय.

एका वेबसाईटनं दिलेल्या माहितीनुसार, शाहिदनं आपल्या लग्नाबद्दल माडियासमोर काही सांगण्यापूर्वीच करीना या गोष्टीबद्दल माहिती दिली होती. करीनानंच या गोष्टीचा खुलासा केलाय. 'आम्ही दोघं एका शोमध्ये परफॉर्म केलं होतं तिथंच शाहिदनं मीडियासमोर काही सांगण्यापूर्वीच ही बातमी मला सांगितली होती. मी त्या दोघांसाठी खूप खूश आहे आणि त्यांचा हा विवाह चांगलाच होईल अशी मी आशा करते' असं बेबोनं म्हटलंय. 

करीना आणि शाहिद तीन वर्षे नात्यात राहिल्यानंतर आपला ब्लॉकबस्टर सिनेमा 'जब वी मेट'नंतर वेगवेगळे झाले होते. यानंतर हे ऑन स्क्रीन जोडपं 'मिलेंगे मिलेंगे' या चित्रपटात दिसलं होतं. आता, लवकरच हे दोघं अभिषेक चौबे याचा सिनेमा 'उडता पंजाब'मध्ये दिसणार आहे. या सिनेमात आलिया भट्ट हिचीदेखील प्रमुख भूमिका आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.