मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री कतरिना कैफ येत्या नोव्हेंबरमध्ये बोहल्यावर चढतेय. पाकिस्तानी अभिनेता फवाद खान याच्यासोबत ती लग्न करणार आहे.
तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसला ना?...मात्र हे खरेखुरे लग्न नाहीये. तर चित्रपटात ती फवादसोबत लग्न कऱणार आहे. हे दोघेही करण जोहरच्या चित्रपटाच पहिल्यांदा मुख्य भूमिकेत एकत्र दिसणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, करण जोहर आणि फॉक्स स्टार स्टुडिओजच्या चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य धर करतायत. ही कहाणी आधारित आहे उत्तर प्रदेशातील एका लग्नावर. यात कतरिना आणि फवाद यांची लव्हस्टोरी दाखवण्यात आलीये.
नोव्हेंबरमध्ये या चित्रपटाचे शूटिंग सुरु होणार आहे. 2017मध्ये हा सिनेमा रिलीज होणार आहे. फवाद आणि कतरिनाची जोडी पहिल्यांदा या चित्रपटाच्या रुपाने प्रेक्षकांसमोर येणार आहे.