मुंबई : मराठी चित्रपटांना अनोखी मेजवाणी देणारा ख्वाडा चित्रपट ठरला आहे, शेती विकून ख्वाडाची निर्मिती दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांनी केली आहे. यामुळे ख्वाडा यशस्वी होतोय का याकडे सर्वाचं लक्ष लागून होतं.
अखेर ख्वाडाची घौडदौड सुरू झाली आहे. प्रेक्षकांनी ख्वाडाला उदंड प्रतिसाद देण्यास सुरूवात केली आहे. ख्वाडा हा सिनेमा शहरी प्रेक्षकांना अनोख्या ग्रामीण संस्कृतीत घेऊन जातो, शहरात राहणाऱ्या लोकांसाठी ग्रामीण भागात जाण्याची ही अनोखी मेजवानी आहे, सिनेमाचे दोन-अडीच तास सर्वांसाठी ग्रामीण भागात गेल्याची अनुभूती देतात.
ख्वाडाला परदेशातही मोठा प्रतिसाद लाभण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. धनगरांची संस्कृती जी लोप पावण्याच्या मार्गावर आहे, ती देखील जवळून पाहण्याचा दुर्मिळ अनूभव ख्वाडाच्या माध्यमातून प्रेक्षकांना मिळत आहे.
पाहा ख्वाडा चित्रपटातील लोकप्रिय गाणं
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.