जयंती वाघधरे, झी मीडिया, मुंबई : मराठी संगीत रंगभूमीवरचं एक अजरामर नाट्यकलाकृती म्हणजे कट्यार काळजात घुसली हे नाटक, याच नाटकावर बेतलेला सिनेमा म्हणजे कटयार काळजात घुसली.. अभिनेता सुबोध भावे दिग्दर्शित या कट्यार काळजात घुसली या सिनेमात मुख्य भूमिका साकारली आहे.
ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर, प्रसिद्ध गायक शंकर महादेवन आणि स्वतः अभिनेता सुबोध भावे यांनी.. या सिनेमाची ट्रु स्टोरी मी तुम्हाला सांगणार आहे पण त्याआधी या सिनेमावर एक नजर टाकू य़ा..
काय आहे कथा
कला मोठी की कलाकार... महत्व कलेला दिलं पाहिजे की त्या कलेचा जिथे जन्म झाला त्या घराण्याला.. गुरू आणि शिष्य यांच्यातली नाती, शिष्टाचार.. अशा काहीशा पार्श्वभूमीवरचा हा सिनेमा आहे.. ही कथा आहे पंडित भानुशंकर आणि खाँसाहेब या दोन व्यक्तीरेखेची.. त्यांच्या घराण्यांची आणि या घराण्यामध्ये स्वतःचं वेगळेपण आणि श्रेष्ठता सिद्ध करण्याची ही स्पर्धा या सिनेमात अनुभवायला मिळते..
कसे झाले दिग्दर्शन
जुन्या गाण्यांची ORIGANALITY जपत ज्या पध्तीनं कट्यार मध्ये गाणी कंपोज करण्यात आली आहेत, ती लाजवाब वाटतात,, आपल्या पहिल्याच सिनेमासाठी अशा प्रकारचा विषय किंवा इतकी मोठी जबाबरदारी अतिशय sincerely पेलणं हे खरंतर सोपं नाही.. सुबोधच्या या कामगिरीसाठी त्याला hatsoff आहे.. केवळ दिग्दर्शनंच नाही तर या सिनेमात त्यानं एक महत्वाची व्यक्तीरेखा साकारली आहे.. एकीकडे दिग्दर्शन करत दुसरीकडे आपल्या वाटेला आलेल्या भूमिकेलाही तितकंच न्याय देणं या साठी सुबोधला १० ऑन १०..
कसा झाला अभिनय
सुबोधसोबतच सिनेमात अभिनेता सचिन पिळगावकर यांनी साकारलेली खाँसाहब ही भूमिका कमाल झाली.. खरं तर सचिन पिळगावकर यांना या पूर्वी अशा प्रकारच्या व्यक्तिरेखेत कधी पहायला मिळालं नाही.. त्यांच्या अभिनय कारकिर्दीतली ही भूमिका कायम लक्षात राहण्यासारखी आहे.. केवळ अभिनयच नव्हे तर त्यांनी संवाद फेकीची शैलीही कमाल वाटते.. उर्दु या भाषेवरचा त्यांचा अभ्य़ास, एक एक शब्दाचं उच्चारण हे सगळे फॅक्टर्स out of the box वाटतात.. याच बरोबर शंकर महादेवन यांनी साकारलेला पंडितजी, ही व्यक्तिरेखाही सुंदर झालीये..
अभिनेत्री अमृता खानविलकर, मृण्मयी देशपांडे आणि पुष्कर श्रोत्री या नटांनीही चांगला अभिनय केलाय.. या सगळ्या गोष्टी पाहता मी 'कट्यार काळजात घुसली या सिनेमाला देतेय ४ स्टार्स..
पाहा व्हिडिओ रिव्ह्यू...
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.