दोन मिनिटांच्या 'मिस यूनिव्हर्स'ला पॉर्न इंडस्ट्रीचं आमंत्रण!

'मिस यूनिव्हर्स २०१५' या स्पर्धेत चुकीच्या घोषणेमुळे अगदी दोन मिनिटांसाठी हा मुकूट आपल्या डोक्यावर चढवणाऱ्या 'मिस कोलंबिया'ला पॉर्न इंडस्ट्रीकडून निमंत्रण मिळालंय.

Updated: Dec 26, 2015, 01:51 PM IST
दोन मिनिटांच्या 'मिस यूनिव्हर्स'ला पॉर्न इंडस्ट्रीचं आमंत्रण! title=

नवी दिल्ली : 'मिस यूनिव्हर्स २०१५' या स्पर्धेत चुकीच्या घोषणेमुळे अगदी दोन मिनिटांसाठी हा मुकूट आपल्या डोक्यावर चढवणाऱ्या 'मिस कोलंबिया'ला पॉर्न इंडस्ट्रीकडून निमंत्रण मिळालंय.

'मिस कोलंबिया' अॅड्रियाना गुट्रेझ हिला 'मिस यूनिव्हर्स २०१५' या स्पर्धेत चुकीनं विजेती म्हणून घोषित करण्यात आलं होतं. पण, त्यानंतर मात्र चूक सुधारत तिच्या डोक्यावरून हा मुकूट काढून फिलिपाईन्सच्या पियाला चढवण्यात आला.

अधिक वाचा - फिलिपाईन्सची पिया अलोन्झो मिस युनिव्हर्स 
 
हे थोडं होतं म्हणून की अॅड्रियानाला आता पॉर्न इंडस्ट्रीनं आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केलाय. यासाठी तिला एक मिलियन डॉलर म्हणजेच ६५,९४७,४५९ रुपयांचं आमिषही दाखवण्यात आलंय. 

एव्हढच नाही तर पॉर्न इंडस्ट्रीतल्या विविध एन्टरटेन्मेंटनं आपला पार्टनर निवडण्याचीही मुभा दिलीय. कोणत्या पद्धतीनं सेक्स करायचं याचा निर्णय घेण्याचीही तिला परवानगी देण्यात आलीय.

व्हिडिओ : Opps! 'मिस युनिव्हर्स' स्पर्धेतली घोडचूक वायरल!

पॉर्न इंडस्ट्रीच्या या आमंत्रणाला मिस कोलंबियानं मात्र काहीही प्रत्यूत्तर दिलेलं नाही.