मुंबई : मी देशासाठी क्रिकेट खेळावं असं माझ्या वडिलांना वाटत होतं असं सुल्तान फेम सलमान खानचं म्हणणं आहे. भारताची टेनिसपटू सानिया मिर्झाच्या एस अगेन्स्ट ऑड्स या आत्मचरित्राच्या प्रकाशनावेळी सलमानने हे वक्तव्य केलं.
वडील सलीम खान यांनी माजी क्रिकेटपटू सलीम दुर्रानी यांना सलमानचे प्रशिक्षक म्हणून नेमलं होतं. खरंतर सलमान चांगलं क्रिकेट खेळायचा. पण ज्या दिवशी वडील बघायला आले त्यादिवशी सलमान जाणून-बुजून खराब खेळला. कारण सकाळी 5.30 वाजता क्रिकेटसाठी मैदानावर जाणं त्याला शक्य नव्हतं.
क्रिकेटमध्ये सलमानचं भविष्य उज्ज्वल असेल असं त्याच्या प्रशिक्षकांचं मत होतं. पण साधं शाळेतही वेळेवर न पोहोचणारा सलमान क्रिकेटसाठी सकाळी मैदानावर पोहोचणं शक्य नव्हतं. त्यामुळे सलमान क्रिकेटर न बनता अभिनेता बनला.