सलमानच्या कुुटुंबीयातील तुम्हाला अपरिचित असलेल्या १० व्यक्ती

सलमानच्या कुटुंबातील काही लोकांबाबत बऱ्याच लोंकाना माहित असतील पण त्याच्या कुटुंबात आणखी काही अशी लोकं आहेत जी तुम्हाला माहित नसतील.

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Jan 16, 2016, 06:13 PM IST
सलमानच्या कुुटुंबीयातील तुम्हाला अपरिचित असलेल्या १० व्यक्ती title=
salman khan, salman khan family

मुंबई : सलमानच्या कुटुंबातील काही लोकांबाबत बऱ्याच लोंकाना माहित असतील पण त्याच्या कुटुंबात आणखी काही अशी लोकं आहेत जी तुम्हाला माहित नसतील.

जाणून घ्या कोण आहेत त्या तुम्हाला माहित नसलेल्या सलमानच्या कुटुंबातील त्या व्यक्ती.

हे दोघेही सलमानचा भाऊ सोहेल खान याची मुले आहेत. सलमान खानच्या ते खूपच जवळ आहे.

सीमा सचदेव खान ही सोहेल खानची पत्नी आहे. सलमानची वहिणी मलाईका अरोडा खान सगळ्यांना माहित आहे पण सीमा खान ही बऱ्याच लोकांना माहित नाही.

सलमान खानची भाची एलिहाज अग्निहोत्री ही सलमान खानची सखी बहिण अलवीरा खान हिची मुलगी आहे. सध्या ती शिक्षण पूर्ण करते आहे पण ती स्वत:ची अभिनेत्री म्हणून ओळख करुण देते.

मुंबईच्या एका कोर्टाने सलमानला जेव्हा ५ वर्षांची शिक्षा सुनावली तेव्हा सलमानला आपले अश्रृ अनावर झाले तेव्हा बहिण अलवीरा खान ही धावपळ करतांना दिसली आणि तिने सलमानला जामीन मिळवून दिला. 

सलमान खानचे भाऊजी अतुल अग्निहोत्री याने काही चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ते आता एक सिनेनिर्माता म्हणून ओळखले जातात. अलवीरा खान हिचे ते पती आहेत.

सलमान खानची साली अमृता अरोडा म्हणजेच मलाईकाची बहिण ही देखील खान कुटुंबीयांच्या सुखदु:खात नेहमी त्यांच्या सोबत असते.

सलमान खानची आई हेलनला तर अनेक लोक ओळखतात पण सलमानची दुसरी आई सुशीला तरक ही खूप कमी लोकांना माहित आहे. हेलन यांना कोणतेही अपत्य नाही. 

गौतम गंभीर हा देखील आता सलमान नातेवाईक झाला आहे. सलमानची दत्तक घेतलेली बहिण अर्पिता हिचे काही दिवसांपूर्वीच लग्न पार पडलं पण ज्या घरात सलमानती बहिण दिली आहे त्याच घराच गौतम गंभीरची बहिण देखील दिली आहे.

श्वेता रोहिरा ही सलमानची आणखी एक मानलेली बहिण. मागच्या वर्षी सलमानने स्वत: तिचे कन्यादान केलं होतं.