बलात्कारप्रकरणी पिपली लाईव्हच्या दिग्दर्शकाला सात वर्षांची शिक्षा

बलात्कारप्रकरणी पिपली लाईव्ह चित्रपटाचे सहदिग्दर्शक महमूद फारुकीला सात वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

Updated: Aug 4, 2016, 08:25 PM IST
बलात्कारप्रकरणी पिपली लाईव्हच्या दिग्दर्शकाला सात वर्षांची शिक्षा  title=

दिल्ली : बलात्कारप्रकरणी पिपली लाईव्ह चित्रपटाचे सहदिग्दर्शक महमूद फारुकीला सात वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. याप्रकरणी महमूदला शनिवारी दिल्ली कोर्टानं दोषी ठरवलं होतं. 

भारतीय चित्रपटांवर संशोधन करायला आलेल्या अमेरिकेच्या 30 वर्षांच्या एका महिलेवर फारुकीनं बलात्कार केला. चित्रपटांच्या संशोधनाविषयी बोलण्यासाठी मी फारुकीच्या घरी गेले, तेव्हा दारुच्या नशेत असलेल्या फारुकीनं माझ्यावर बलात्कार केला असा आरोप महिलेनं केला होता. महिलेच्या या आरोपानंतर 19 जून 2015ला याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला होता.