या महिन्यातच होणार रणबीर-कतरिनाचा साखरपुडा!

बॉलिवूडची सर्वात हॉट समजली जाणारी जोडी रणबीर-कतरिना लवकरच साखरपुड्याच्या बंधनात अडकणार आहे. काही दिवसांपूर्वी कपूर फॅमिलीत झालेल्या डिनर प्रोग्रॅमनंतर हे कयास लावले जात आहेत. 

Updated: May 5, 2015, 03:42 PM IST
या महिन्यातच होणार रणबीर-कतरिनाचा साखरपुडा!  title=

मुंबई: बॉलिवूडची सर्वात हॉट समजली जाणारी जोडी रणबीर-कतरिना लवकरच साखरपुड्याच्या बंधनात अडकणार आहे. काही दिवसांपूर्वी कपूर फॅमिलीत झालेल्या डिनर प्रोग्रॅमनंतर हे कयास लावले जात आहेत. 

या डिनर पार्टीमध्ये रणबीर-कतरिनाच्या साखरपुड्याबाबत चर्चा झाल्याचं कळंतय. जर सर्वकाही ठरल्यानुसार झालं तर याच आठवड्यात रणबीर-कतरिनाचा सारखपुडा होऊ शकतो. या कार्यक्रमाला केवळ खास मित्र आणि कुटुंबियच हजर राहतील, अशी माहिती मिळतेय. 

नेहमी एकत्र दिसणारे आणि सध्या एकत्र राहत असलेले रणबीर-कतरिना आपल्या रिलेशनशीपबद्दल बोलणं त्यांनी टाळलंय. आमच्या लग्नाबद्दल कयास लावू नका, असा सल्ला त्यांनी मीडियाला दिला. पण त्यांच्या कुटुंबियांना मात्र त्यांना आता बंधनात अडकवायचं दिसतंय. 

एका इंग्रजी वृत्तपत्रानुसार रणबीर-कतरिनाच्या लग्नाची बोलणी झालेली आहे. रणबीर कपूर आणि कतरिना कैफच्या लग्नाबद्दल कपूर कुटुंबामध्ये या महिन्याच्या अखेरीस एका कार्यक्रमाचं आयोजन होवू शकतं. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.