रविना लवकरच बनणार 'सासू'बाई!

बॉलिवूड अभिनेत्री रविना टंडन हिनं आपल्या चाहत्यांना एक खुशखबर दिलीय. 

Updated: Jan 22, 2016, 02:37 PM IST
रविना लवकरच बनणार 'सासू'बाई! title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री रविना टंडन हिनं आपल्या चाहत्यांना एक खुशखबर दिलीय. 

रविनाची छोटी मुलगी छाया ही येत्या काही दिवसांत बोहल्यावर चढतेय असं सांगितलं तर तुमचा विश्वास बसणार नाही. पण, ही न्यूज खुद्द रविनानंच दिलीय. 

 

रविनानं १९९० मध्ये दोन मुलींना दत्तक घेतलं होतं. त्यापैंकी छाया हिच्या विवाहसोहळ्याच्या तयारीत रविना सध्या गुंतलीय. हिंदू - ख्रिश्चन पद्धतीनं गोव्यात हा विवाहसोहळा पार पडणार आहे. आपला हा आनंद तिनं ट्विटरवरून आपल्या चाहत्यांशी शेअर केलाय.

२०११ मध्ये रविनाच्या मोठ्या मुलीचा विवाह पार पडला होता. रविनानं फिल्म डिस्ट्रिब्युटर अनिल थडानी यांच्यासोबत विवाह केलाय. त्यांच्या संसारवेलीवर मुलगी राषा आणि मुलगा रणबीर अशी दोन फुलंही उमललीत.