जेव्हा शाहरूखने पत्नीला म्हटले Thanks..

बॉलीवूडचा बादशहा शाहरूख खान आणि गौरी खान यांच्या लग्नाला २४ वर्ष पूर्ण झालेत. शाहरुखने आपल्या लग्नाच्या २४ व्या वाढदिवसाबद्दल पत्नी गौरी खानचे तिच्या प्रेम, संयम आणि धैयाबद्दल आभार मानले आहे. 

Updated: Oct 26, 2015, 04:18 PM IST
जेव्हा शाहरूखने पत्नीला म्हटले Thanks.. title=

मुंबई : बॉलीवूडचा बादशहा शाहरूख खान आणि गौरी खान यांच्या लग्नाला २४ वर्ष पूर्ण झालेत. शाहरुखने आपल्या लग्नाच्या २४ व्या वाढदिवसाबद्दल पत्नी गौरी खानचे तिच्या प्रेम, संयम आणि धैयाबद्दल आभार मानले आहे. 

२५ ऑक्टोबर १९९१ मध्ये शाहरूख आणि गौरी यांचे लग्न झाले होते. शाहरूख पत्नी गौरीच्या प्रेम, संयम आणि धैयाबद्दल thanks म्हटले आहे. आठ वर्ष रिलेशनशीपमध्ये राहिल्यानंतर गौरी आणि शाहरूख यांनी लग्नाचा निर्णय घेतला होता. 

शाहरूख आणि गौरी यांना आर्यन (१८) सुहाना (१५) आणि अबराम (२) असे तीन मुलं आहेत. शाहरूखने आपल्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त पत्नीचा फोटो ट्विट करून तिला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. शाहरूखने ट्विटरवर लिहिले की सर्व शुभचिंतकांच्या आशीर्वादासाठी धन्यवाद पण हे धन्यवाद गौरी हिच्या ३२ वर्षाच्या प्रेम, संयम आणि तीन सुंदर मुलांमुळे आहे. 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.