किंग खानचा हॉलीवुडच्या दिग्दर्शकासोबत 'लुंगी डान्स'

Intern Intern | Updated: Apr 16, 2017, 12:16 PM IST
किंग खानचा हॉलीवुडच्या दिग्दर्शकासोबत 'लुंगी डान्स' title=

लॉस एंजिलिसः बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरूख खानने हॉलिवूडच्या ‘फ्रान्सिसको फिल्म’ सोहळ्यात हॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक ब्रेट राटनर यांच्यासोबत ‘लुंगी डान्स’ या शाहरूखच्या गाजलेल्या गाण्यावर ठेका धरला.

शाहरुख ब्रेट राटनर यांना स्टेप शिकवत असल्याचा व्हिडिओ रानटर यांनी इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. त्यावेळी शाहरुखला त्यांनी त्यांच्यासारखा दिसणारा बाहुला भेट दिला.
शाहरुखनेही ट्विटरवरुन राटनर यांनी दिलेल्या बाहुल्यासोबतचा फोटो शेअर केला आहे. तसेच त्यांच्यासोबत घालवलेले ते क्षण खूप आनंदी होते, असे बोलून त्याने राटनर यांचे आभार मानले आहेत. तसेच राटनर यांनी दिलेला बाहुला त्यांच्यासारखाच सुंदर आहे, असेही तो म्हणाला आहे.