अर्पिताच्या लग्नात कॅटनं प्रियंकाला टाळलं

मंगळवारी हैदराबादमध्ये फलकनुमा पॅलेसमध्ये जिथं सर्व बॉलिवूडचे लहान-मोठे कलाकार सलमानच्या लाडक्या बहिणीच्या लग्नासाठी उपस्थित होते. तिथं बॉलिवूडच्या दोन दिग्गज अभिनेत्रींनी एकमेकांकडे पाहिलं सुद्धा नाही. हो आम्ही बोलतोय, कतरिना कैफ आणि प्रियंका चोप्राबद्दल... 

Updated: Nov 20, 2014, 10:40 AM IST
अर्पिताच्या लग्नात कॅटनं प्रियंकाला टाळलं title=

हैदरबाद: मंगळवारी हैदराबादमध्ये फलकनुमा पॅलेसमध्ये जिथं सर्व बॉलिवूडचे लहान-मोठे कलाकार सलमानच्या लाडक्या बहिणीच्या लग्नासाठी उपस्थित होते. तिथं बॉलिवूडच्या दोन दिग्गज अभिनेत्रींनी एकमेकांकडे पाहिलं सुद्धा नाही. हो आम्ही बोलतोय, कतरिना कैफ आणि प्रियंका चोप्राबद्दल... 

हैदराबाद फलकनुमा पॅलेसमध्ये अर्पिता खानच्या लग्नाला आमिर खान, कतरिना कैफ आणि प्रियंका चोप्राच्या उपस्थितीनं चार-चांद लागले. लग्नात सर्व व्यवस्थित सुरू होतं, तर तिकडे असाही प्रकार सुरू होता.  

लग्नाला गेलेल्या एका सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार बॉलिवूडच्या हॉट अभिनेत्री कतरिना कैफ आणि प्रियंका चोप्रा एकमेकींना टाळत होत्या. कतरिनाला पूर्ण वेळ कबीर खान आणि मिनी माथूरसोबत पाहिलं गेलं. तर दुसरीकडे प्रियंका आपल्या मित्रांमध्ये बिझी होती.  

खरं तर कॅट आणि पीसीमधील या कोल्ड वॉरचं काही कारण नाही, पण बॉलिवूडच्या या दिग्गज अभिनेत्रींमधील दुरावा चर्चेचा विषय बनलाय.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.