सोशल मीडियाने पकडली आमीरची परफेक्ट चोरी?

मिस्टर परफेक्ट आमीर खानचं 'पीके' सिनेमाचं नग्न पोस्टर सोशल मीडियात चर्चेत आहे. मात्र आमीर खानने पोस्टरवर दिलेली पोझ ही पहिलीच नाही. 

Updated: Aug 4, 2014, 07:33 PM IST
सोशल मीडियाने पकडली आमीरची परफेक्ट चोरी?

मुंबई : मिस्टर परफेक्ट आमीर खानचं 'पीके' सिनेमाचं नग्न पोस्टर सोशल मीडियात चर्चेत आहे. मात्र आमीर खानने पोस्टरवर दिलेली पोझ ही पहिलीच नाही. 

आमीरने कोणत्या फोटोवरून ही प्रेरणा घेतली, तर काही नेटीझन्सच्या मते चोरी केली, तो फोटोही आता शेअर व्हायला सुरूवात झाली आहे.

खरं तर आमीर खानने ज्या पोझमध्ये फोटो काढला आहे, तसं पोस्टर सत्तरच्या दशकात छापलं गेलं आहे.

जर तुम्हाला या पोस्टरविषयी जाणून घ्यायचं असेल, तर Quim Barreiros (किम बर्रेइरोस) गुगलवर सर्च करा. 

किम बर्रेइरोस हा पोर्तुगाल संगीतकार होता, आणि सत्तरच्या दशकात आपला अल्बम प्रमोट करण्यासाठी, त्याने असाच फोटो काढला होता.

तर काय मिस्टर परफेक्ट आमीर खानही आयडीया चोरतो का? असा सवाल नेटीझन्सने सोशल मीडियावर केला आहे.

या सिनेमात या संगीतकाराशी संबंधित काही दृश्य आहे का? हे मात्र सिनेमा पाहूनच कळणार आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.