हे आहेत बॉलीवूडचे 'हाय एज्युकेटेड' अभिनेते

 ग्लॅमर आणि अभिनयाच्या जोरावर दुनियाभरात नाव कमवणाऱे बॉलीवूड अभिनेते अभ्यासातही काही मागे नाहीत. हे आहेत हाय एज्युकेटेड टॉप बॉलीवूड कलाकार 

Updated: Nov 30, 2015, 01:55 PM IST
हे आहेत बॉलीवूडचे 'हाय एज्युकेटेड' अभिनेते title=

मुंबई :  ग्लॅमर आणि अभिनयाच्या जोरावर दुनियाभरात नाव कमवणाऱे बॉलीवूड अभिनेते अभ्यासातही काही मागे नाहीत. हे आहेत हाय एज्युकेटेड टॉप बॉलीवूड कलाकार 

अमिताभ बच्चन 
बॉलीवूडचे शहेनशहा अशी ओळख असलेले अमिताभ यांनी नैनीतालच्या शेरवुड कॉलेमधून पदवनीचे शिक्षण घेतले. त्यानंतर दिल्ली विद्यापीठातील किरोडीमल कॉलेजमध्ये त्यांनी विज्ञान आणि कला शाखेत शिक्षण पूर्ण केले. बिग बी यांना ऑस्‍ट्रेलियाच्या क्वीन्सलँड युनिर्व्हसिटीमधूनही मानद पदवीने सन्मानित करण्यात आलंय.
प्रीती झिंटा
बॉलीवूडची बबली गर्ल असलेली प्रीती झिंटालाही शिकण्याची आवड होती. शिमला कॉलेमधून इंग्रजी विषयात पदवी घेण्यासह प्रीतीने सॉयकॉलॉजीमध्येही डिग्री घेतली. त्यानंतर तिने क्रिमीनल सायकॉलॉजीमध्ये मास्टर्स केले.
आर. माधवन
तनू वेड्स मनू, थ्री इडियट या चित्रपटातून अभिनयाची चुणूक दाखवणारा आर. माधवनही हाय एज्युकेटेड आहे. इलेक्‍ट्रॉनिक्‍समध्ये पदवी घेतल्यानंतर महाराष्ट्राच्या बेस्ट एनसीससी कॅडेटमध्ये त्याची निवड करण्यात आली. त्यानंतर त्याला इंग्लंडला जाण्याचीही संधी मिळाली होती. 
अमिषा पटेल
कहो ना प्यार है आणि गदर या सुपरहिट चित्रपटातील अभिनेत्री अमिषा पटेल इकॉनॉमिक्समध्ये गोल्ड मेडलिस्‍ट राहिली आहे. याव्यतिरिक्त अमिषाने बायोजेनेटिक इंजिनीयरिंगचीही पदवी घेतलीये. 
परिणीती चोप्रा
पेशाने बँकर असलेली परिणीती अपघाताने अभिनयाकडे वळली. परिणितीने अंबाला कॉन्वेंट स्कूलमध्ये शिक्षण घेतल्यानंतर पुढील शिक्षणासाठी ती लंडनला गेली. तेथे तिने इकॉनॉमिक्स, बिझनेस आणि फायनान्स या तीन विषयांत पदवी घेतली. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.