नवी दिल्ली : बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांची जोडी सध्या बॉलीवूड वर्तुळात चांगलीच चर्चेत आहे. नुकतेच श्रीलंकेत दीपिकाच्या बेस्ट फ्रेंडचे लग्न झाले. या लग्नात रणवीर आपली सर्व कामे सोडून गेला होता.
यावेळी दीपिकाचे कुटुंबीयही लग्नात उपस्थित होते. रणवीर नेहमीच दीपिकाच्या कुटुंबियांसोबत दिसतो. आपल्या गर्लफ्रेंडला खुश ठेवण्यासाठी रणवीर सर्वतोपरी प्रयत्न करतोय.
दीपिका सध्या हॉलीवूडपट xXx या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. मात्र त्यातून तीन दिवसांची सुट्टी घेऊन ती श्रीलंकेला तिच्या बेस्ट फ्रेंडच्या लग्नात आली होती. दीपिका श्रीलंकेत म्हटल्यावर रणवीर भारतात कसा राहील?. मग काय तोही दीपिकाच्या फ्रेंडच्या लग्नात पोहोचला. त्यानेही आपल्या कामातून सुट्टी घेतली आणि श्रीलंकेत दाखल झाला.
यावरुन दीपिकावर रणवीरचे किती प्रेम आहे हे दिसून येतेय. या लग्नात दीपिकाच्या कुटुंबियांसोबत रणवीर एकदम खुलेपणाने वावरत होता. या दोघांच्याही घरातील व्यक्तींचा या नात्याला विरोध नाहीये. रणवीरच्या घरचेही दीपिकावर प्रेम करतात.
दीपिकाच्या बेस्ट फ्रेंडचे लग्न तर झाले आता पुढचा नंबर दिपीकाचा असणार का? असा प्रश्न विचारला जातोय. इथे तर मिया बिंवी राजी, त्यांचे कुटुंबियही राजी तो क्या करेगा काझी. त्यामुळे या दोघांच्या लग्नाची घोषणा झाल्यास आश्चर्य वाटणार नाही.