मुंबई : अभिनेता सलमान खान आणि गायक अरिजित सिंग यांचा पडद्यामागचा वाद आता मात्र चव्हाट्यावर आलाय. पण, हा वाद नेमका का सुरू झाला?
हा वाद सुरू झाला तो फेब्रुवारी २०१४ मध्ये... गिल्ड अॅवॉ़र्डमध्ये अरिजित सिंगला 'बेस्ट सिंगर' म्हणून पुरस्कार मिळाला होता... आणि हा कार्यक्रम होस्ट करत होता सलमान खान... आणि या कार्यक्रमात 'तुमच्या कार्यक्रमाच्या अशा होस्टिंगमुळे मला झोप आली' असा टोमणा अरिजितनं सलमानला मारला होता.