... आणि सनी लिऑननं दिलं ‘Ice बकेट चॅलेंज’!

बॉलिवूडमध्येही सध्या एएलएस आइस बकेट चॅलेंज स्पर्धेची धूम आहे. अनेक कलाकारांनी यात भाग घेतलाय. नुकताच अभिनेत्री सनी लिऑननं हे चॅलेंज पूर्ण केलंय. 

Updated: Aug 24, 2014, 02:25 PM IST
... आणि सनी लिऑननं दिलं ‘Ice बकेट चॅलेंज’! title=

मुंबई: बॉलिवूडमध्येही सध्या एएलएस आइस बकेट चॅलेंज स्पर्धेची धूम आहे. अनेक कलाकारांनी यात भाग घेतलाय. नुकताच अभिनेत्री सनी लिऑननं हे चॅलेंज पूर्ण केलंय. 

एएलएस फाऊंडेशनच्यावतीनं आयोजित या चॅरिटी चॅलेंज सनीनंही पूर्ण केलं आणि बर्फाच्या पाण्यानं आंघोळ केली. यानंतर तिनं आपला मित्र आणि रॅपर यो यो हनी सिंहचं नाव नॉमिनेट केलंय.  

सनीनं ट्विटरवर व्हिडिओ पण शेअर केलाय. सनीनं सांगितलं, ‘तिचं कुटुंब आणि काही ट्विटर फॅन्सने तिचंही नाव या आइस बकेट चॅलेंजसाठी नॉमिनेट केलं होतं. मी हे चॅलेंज स्वीकारलं.’ 

सनीला तिच्या नवऱ्यानं आइस बकेटनं आंघोळ घातली. तिनं हनी सिंहला नॉमिनेट केलंय. सनीनं सांगितलं, आता मी यो यो हनी सिंहला नॉमिनेट करतेय. 24 तासांनंतर रिझल्ट पाहू. विशेष म्हणजे रितेश देशमुख, अभिषेक बच्चन, बिपाशा बसू, सोनाक्षी सिन्हा, सानिया मिर्झा, ज्वाला गुट्टासह अनेक सेलिब्रिटींनी बर्फाच्या पाण्यानं आंघोळ केलीय. 

पाहा व्हिडिओ 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.