मुंबई : बॉलिवूड अभिनेता विनोद खन्ना यांच्या निधनाची बातमी कळताच बॉलिवूडवक शोककळा पसरली. अमिताभ बच्चन यांना जेव्हा ही गोष्ट कळाली तेव्हा ते एका मुलाखतीतून लगेचच निघाले. इंटरव्यू सोडून ते लगेचच विनोद खन्ना यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी पोहोचले. अमिताभ यांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला.
खलनायकाच्या भूमिकेतून आपल्या फिल्मी करियरला सुरुवात केलेल्या विनोद खन्ना यांनी हिंदी सिनेसृष्टीवर आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. अभिनेता विनोद खन्ना हे बॉलीवूडमधील स्मार्ट हिरोंपैकी एक होते. १९८० साली अशी वेळ आली होती की, अभिताभ आणि विनोद खन्ना यांच्या सिनेमांना प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं.
महानायक अभिताभ बच्चन यांचं स्टारडम विनोद खन्ना संपवेल अशी वेळ आली होती. मात्र अचानक विनोद खन्ना हे अध्यात्माकडे वळले, आणि त्यांनी बॉलिवूडचं काम सोडलं. मात्र जेव्हा विनोद खन्ना अध्यात्माकडून फिल्म इंडस्ट्रीत परतले तेव्हा पदार्पण शानदार होतं, मात्र काळ विनोद खन्नांसाठी थांबला नव्हता. कारण विनोद खन्ना यांना त्या तोडीची भूमिका मिळाली नाही आणि मिळाली तरी प्रेक्षकांनी तेवढा प्रतिसाद दिला नाही.