मुंबई : यो यो हनी सिंग आपल्याच घरात कैद आहे. हनी सिंग आपल्या गाण्यावर अनेकांना तालावर नाचवत असे. मात्र, हा तरुणांच्या गळ्यातील ताईत तो आता दिसणार नाही.
हा रॅपर गायक गेला कुठे, असा प्रश्न विचारला जात आहे. मात्र, हनीच्या बाबती एक घटना घडली. या घटनेनंतर तो खचला. त्याला एकाने जोरदार छपड लगावली. त्यानंतर तो एकटाच राहत आहे. तो तणावाखाली असल्याचे त्याच्या पत्नीने सांगितले.
जुलै महिन्यापासून तो आजारी असल्याचे पत्नी शालिनेने सांगितले. त्याला संगीत कम्पोज करण्यात समस्या येत आहे. तो तणावाखाली आहे. डॉक्टरांनी त्याला दोन महिने आराम करण्यास सांगितले आहे. त्याची तब्बेत ठिक नसल्याने तो घरातच असल्याचे सांगितले जात आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.