मुंबई : सध्या, अभिनेत्री करिना कपूर खान आपल्या आगामी 'की अॅन्ड का' या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. या दरम्यान आपल्याला कधीही होळी खेळायला आवडत नाही असं उत्तर करिनानं दिलंय.
करिना आणि तिचा 'का' म्हणजेच अर्जुन कपूर यांच्यातलं हे एक साम्य म्हणता येईल. कारण, अर्जुनही कधी होळी खेळत नाही.
होळीमध्ये वापरले जाणारे कलर अजिबात आवडत नाहीत म्हणून आपण होळी खेळत नाही असं अर्जुननं म्हटलंय.
तर, करिनाला हाच प्रश्न विचारला असता 'लूक' कॉन्शिअस असेलल्या करिनानं 'मला केसांचा रंग खराब होण्याची भीती वाटते, म्हणून मी होळी खेळत नाही' असं उत्तर दिलं.