सिंधुदुर्ग : विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी दु:ख व्यक्त करावं की आनंद? या विवंचनेत काँग्रेसचे कार्यकर्ते दिसले... इथं पित्याची झालेली हार सहन न झाल्यानं एका मुलाला आपल्या विजयाचा आनंदही साजरा करता येत नसल्याचं चित्र आहे.
कुडाळ मतदारसंघात सेनेचे वैभव नाईक जायंट किलर ठरले... त्यांनी काँग्रेस नेते आणि पक्षाचे प्रचारप्रमुख नारायण राणे यांच्यावर तब्बल 10207 मतांनी मात केलीय... पण, नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे यांनी मात्र कणकवली मतदारसंघात 25979 मतांनी विजय मिळवलाय.
निकाल जाहीर झाल्यानंतर नारायण राणे यांनी आपल्या मुलाला पुष्पगुच्छ देऊन त्यांचं अभिनंदन केलं... मात्र, हा विजयाचा आनंद काही नितेश राणेंना साजरा करता आला नाही... वडिल हरल्याचं दु:ख त्यांना सहन झालं नाही आणि त्यांनी कार्यकर्त्यांसमोर वडिलांना मिठी मारत आपल्या आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.