शिवसेनेची दिल्लीत भाजप नेत्यांशी पडद्याआड चर्चा

शिवसेना नेते दिल्लीहून मुंबईत परतलेत. मात्र, शिवसेना नेत्यांची भाजपच्या नेत्यांशी चर्चा झाली की नाही याबाबत संभ्रम आहे. दरम्यान, युतीसंदर्भातील निर्णय पक्षातर्फेच घेतले जात असल्याने यावर सविस्तर चर्चा करुन पुढील निर्णय घेतले जातील, असे भाजप नेते जे. पी. नड्डा यांनी शिवसेनेसोबतच्या युतीबाबत भाष्य केले.

Updated: Oct 22, 2014, 01:41 PM IST
शिवसेनेची दिल्लीत भाजप नेत्यांशी पडद्याआड चर्चा title=

मुंबई : शिवसेना नेते दिल्लीहून मुंबईत परतलेत. मात्र, शिवसेना नेत्यांची भाजपच्या नेत्यांशी चर्चा झाली की नाही याबाबत संभ्रम आहे. दरम्यान, युतीसंदर्भातील निर्णय पक्षातर्फेच घेतले जात असल्याने यावर सविस्तर चर्चा करुन पुढील निर्णय घेतले जातील, असे भाजप नेते जे. पी. नड्डा यांनी शिवसेनेसोबतच्या युतीबाबत भाष्य केले.

शिवसेना नेते अनिल देसाई आणि सुभाष देसाई  दिल्लीत गेले होते. राज्यातील सत्तास्थापनेविषयी भाजप नेत्यांसोबत चर्चा करण्यासाठी दिल्ली दरबारी गेलेत. ते बुधवारी सकाळी मुंबईत परतले आहेत. शिवसेना नेत्यांची भाजप नेत्यांसोबत पडद्याआड चर्चा झाली असली तरी याविषयी कमालीची गुप्तता पाळण्यात येत असल्याने संभ्रम कायम आहे.
 
दिल्लीत महाराष्ट्रातील भाजपचे निरीक्षक राजनाथ सिंह आणि जे.पी. नड्डा यांची हे दोन्ही नेते भेटही घेणार होते. त्यानंतर महाराष्ट्रातील सत्तास्थापनेसाठी भाजपाचा प्रस्ताव प्राप्त झाल्यावर हे दोन्ही नेते मुंबईत येऊन उद्धव ठाकरेंशी चर्चा करणार होते. मात्र, चर्चा झाली की नाही, याची कोणतेही माहिती दोन्ही पक्षांकडून देण्यात आलेली नाही.

भाजप नेत्यांशी शिवसेना नेत्यांची पडद्याआड चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. नेमकी काय चर्चा झाली, शिवसेना भाजपाला पाठिंबा देणार का याविषयी काहीही समजू शकलेले नाही. दरम्यान, मुंबईत परतल्यावर सुभाष देसाई व अनिल देसाई हे दुपारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेऊन दिल्लीवारीची माहिती त्यांना देतील. याविषयीची माहिती उद्धव ठाकरेच सर्वांना देतील असे सांगत शिवसेना नेत्यांनी अधिक बोलण्यास नकार दिला आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.