जळगावमध्ये सलग ३० वर्षे आमदार असलेले सुरेश जैन यांना निवडणूक सोपी राहिलेली नाही. घरकूल घोटाळा प्रकरणात सुरेश जैन सध्या धुळ्याच्या तुरूंगात आहेत. तुरूंगात राहून निवडणूक जिंकणे हे मोठं आवाहन सुरेश जैन यांच्यासमोर आहे.
सुरेश जैन यांनी मात्र या आधी जळगाव महापालिकेत खानदेश विकास आघाडीच्या माध्यमातून सत्ता राखली आहे. मात्र जिल्हा बँकेत सत्ता राखण्यात सुरेश जैन यांना यश आलेलं नाही.
एकंदरीत सुरेश जैन यांच्या नावाचा दबदबा हा फक्त जळगाव शहरात आहे. इतर तालुके अथवा गावात हा दबदबा दिसून येत नाही.
सलग ३० वर्षे आमदार राहितलेले सुरेश जैन यांच्या जळगाव विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी, मनसे आणि भाजपचे तगडे उमेदवार रिंगणात असल्यामुळे त्यांचे विजयरथाला अडथळे निर्माण होणार आहेत.
या दिग्गज नेत्यांबरोबरच जिल्ह्यातील विद्यमान आमदारांनासुद्धा वरीष्ठ पातळीवर घेतलेल्या या निर्णयाचा फटका बसणार आहे. या निवडणुकीत नव्याने रिंगणात आलेल्या काही उमेदवारांना मात्र या निर्णयाचा फायदा होवू शकतो.
एकुणच ऐन उमेदिच्या काळात मिळालेल्या या सोडचिठ्ठीमुळे दिग्गजांबरोबरच विद्यमान आमदारांना सुद्धा निवडणुकीचे निकाल धक्का देणारे ठरू शकतात.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.