नाशिकमधील किशोरसुधार गृहातून १२ मुलांचे पलायन

 शासकीय किशोरसुधार गृहातून १२ मुले पळाली आहेत. नाशिकमध्ये पहाटे पाच वाजता हा प्रकार घडला.

Updated: Jan 11, 2016, 11:17 AM IST
नाशिकमधील  किशोरसुधार गृहातून १२ मुलांचे पलायन title=

नाशिक :  शासकीय किशोरसुधार गृहातून १२ मुले पळाली आहेत. नाशिकमध्ये पहाटे पाच वाजता हा प्रकार घडला.

ठक्कर बाजार परिसरात असणाऱ्या या किशोर सुधारगृहाची किमान दहा फूट उंच कुंपणावरून भिंतीवरून उड्या टाकून पळाली आहेत. याप्रकारानंतर नाशिक पोलिसात एकच खळबळ उडालीय. 

पहाटे पाच पासूनचं शोध सुरू आहे. पण पोलिसांना त्यांना पकडण्यात यश आलेलं नाही. या घटनेत काही गंभीर गुन्ह्यातील कैदी असण्याचो शक्यता आहे. या सुधारललायता १८ ते २३ वयोगटातील किशोर मुलाना ठेवण्यात येते. या मुलांना पकडण्यासाठी पोलिसांनी संपूर्ण शहरातील विविध परिसरात नाकेबंदी केली आहे.