रोहित शर्माचा उत्तराधिकारी ठरला? 'हा' खेळाडू होणार भारताच्या वनडे संघाचा कर्णधार

 चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर टीम इंडियाचा वनडे फॉरमॅटमधील कर्णधार सुद्धा बदलला जाऊ शकतो. 

पुजा पवार | Updated: Feb 8, 2025, 10:56 AM IST
रोहित शर्माचा उत्तराधिकारी ठरला? 'हा' खेळाडू होणार भारताच्या वनडे संघाचा कर्णधार title=
(Photo Credit : Social Media)

Team India : चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 सुरु होण्यासाठी आता अवघे काही दिवस शिल्लक आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये (Champions Trophy 2025) टीम इंडिया कसं परफॉर्म करते यावर कर्णधार रोहित शर्माचे (Rohit Sharma) वनडे फॉरमॅटमधील भविष्य अवलंबून असेल. 2024 चा टी 20 वर्ल्ड कप जिंकल्यावर 37 वर्षांच्या रोहित शर्माने टी 20 फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली होती. त्यानंतर सूर्यकुमार यादवकडे टी 20 चे कर्णधारपद सोपवण्यात आले. परंतू आता चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर टीम इंडियाचा वनडे फॉरमॅटमधील कर्णधार सुद्धा बदलला जाऊ शकतो. 

कोण होणार वनडे कर्णधार? 

समोर आलेल्या एका रिपोर्टनुसार स्टार ऑल राउंडर हार्दिक पंड्या हा रोहितनंतर भारतीय संघाचा वनडे कर्णधार होईल असे सांगण्यात आले आहे. हार्दिक पंड्याने यापूर्वी देखील बड्या खेळाडूंच्या अनुपस्थितीत टीम इंडियाचे नेतृत्व केले होते. परंतु टी 20 वर्ल्ड कपमध्ये उपकर्णधार असलेल्या हार्दिक पंड्याला बीसीसीआयने टी 20 फॉरमॅटमधील कर्णधारपदापासून दूर ठेवलं. त्याऐवजी सूर्यकुमार यादवला टीम इंडियाच्या टी 20 संघाचं कर्णधार बनवलं. एवढंच नाही तर हार्दिक पंड्याला इग्नोर करून चॅम्पियन्स ट्रॉफी संघात उपकर्णधार म्हणून शुभमन गिलला संधी दिली तर इंग्लंड विरुद्ध टी 20 सीरिजमध्ये देखील अक्षर पटेलला उपकर्णधार करण्यात आले होते. 

हेही वाचा : वर्ल्ड कप विजेत्या 15 खेळाडूंना BCCI कडून हिऱ्याची अंगठी, काय आहे यात खास? किंमत ऐकून थक्क व्हाल

गौतम गंभीरची पसंती हार्दिक : 

दैनिक जागरणने दिलेल्या एका रिपोर्टनुसार जर टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्यात अयशस्वी झाली तर ऑल राउंडर हार्दिक पंड्याला वनडे कर्णधार बनवले जाऊ शकते. काही दिवसांपूर्वी एका रिपोर्टमध्ये खुलासा करण्यात आला होता की मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरला चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये हार्दिक पंड्यालाच उपकर्णधार ठेवायचे होते. परंतु रोहित शर्मा आणि चीफ सिलेक्टर कमिटीचे अध्यक्ष असणारे अजित आगरकर गिलच्या नावावर असून बसले. रिपोर्ट्समध्ये असं देखील म्हणण्यात आलं आहे की हार्दिक पंड्या फक्त वनडे नाही तर टी 20 चं कर्णधारपद देखील मिळवू शकतो. कारण टी 20 कर्णधार सूर्यकुमार यादव खराब फॉर्ममधून जातं आहे. 

बीसीसीआयचे काही अधिकारी आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरचं म्हणणं आहे की हार्दिकवर यापूर्वी अनेकदा अन्य झालाय. फिटनेस संबंधित समस्यांमुळे त्याला कर्णधारपदाच्या शर्यतीतून बाहेर राहावे लागले. परंतु त्याचा फॉर्म अतिशय चांगला आहे. दुसरीकडे टीम इंडियाचा टी 20 कर्णधार सूर्यकुमार यादवमी इंग्लंड विरुद्ध 5 सामन्यांच्या टी 20 सीरिजमध्ये एकूण 28 धावा केल्या. त्यामुळे संघातील त्याच्या जागेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.