इकडे सापडत आहेत दररोज 13 मृतदेह... प्रेमीयुगल जास्त...

नाशिक जिल्ह्यामध्ये सध्या मृतदेह सापडण्याच्या संख्येमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. शवविच्छेदनासाठी दिवसाला तेरा मृतदेह इकडे येत आहेत. 

Updated: Feb 1, 2016, 09:17 PM IST
इकडे सापडत आहेत दररोज 13 मृतदेह... प्रेमीयुगल जास्त... title=

नाशिक: नाशिक जिल्ह्यामध्ये सध्या मृतदेह सापडण्याच्या संख्येमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. शवविच्छेदनासाठी दिवसाला तेरा मृतदेह इकडे येत आहेत. अनेक प्रेमी युगूलं सध्या आत्महत्यांसाठी इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, वणीच्या निर्जन परिसराचा वापर करत आहेत.

 
नाशिक जिल्ह्याला सह्याद्री पर्वतरांगेचा मोठा परिसर लाभलाय. यातला काही भाग ठाणे जिल्ह्यात येतो तर काही भाग गुजरात परिसरात जातो. नेमक्या याच भागात हत्या करून फेकून दिलेले अनेक मृतदेह सापडत आहेत. पोलिसांचा ससेमीरा चुकवत गुन्हेगार याच भागाचा वापर करतायत. अनेक वेळा मुंबईतून हे प्रकार होत असल्याचं दिसून येतंय.

गेल्या वर्षभरात म्हणजे डिसेंबरपर्यंत जिल्हा रूग्णालयात शवविच्छेदनासाठी 2970 मृतदेहांची नोंद झालीय. यातल्या काही मृतदेहांची ओळख पटत नाहीये. एकट्या जानेवारीत 216 तर गेल्या 3 महिन्यात ही संख्या पावणे पाचशेच्या घरात आहे. 
मृतदेहांची वाढत्या संख्येमुळे वैद्यकीय यंत्रणांवरही ताण येतोय, तसंच जिल्हा रुग्णालयामध्ये बेवारस मृतदेह ठेवण्यात अडचण निर्माण होत आहे.