राळेगणसिद्धी : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंच्या स्कॉर्पिओ गाडीला लिलावात ९ लाख ११ हजार रूपये किंमत मिळाली आहे.
अहमदनगरच्या प्रवीण लोखंडे यांनी ही गाडी विकत घेतली. या स्कॉर्पिओच्या विक्रीनंतर अण्णांसाठी इनोव्हा गाडी घेण्यात येणार आहे.
लिलावाचे पैसे विवेकानंद कृतज्ञता निधीत जमा होणार आहेत. अण्णांच्या स्कॉर्पिओ गाडीसाठी १५ जणांनी बोली लावली होती. मात्र श्रीगोंदा तालुक्यातील देवदेठनचे ग्रामपंचायत सदस्य असलेले प्रवीण लक्ष्मण लोखंडे यांनी ही स्कॉर्पिओ खरेदी केली.
जन लोकपाल आंदोलनापूर्वी अण्णा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असताना नागपूरमध्ये याच गाडीवर हल्ला झाला होता.
अण्णांच्या स्कार्पिओने आजपर्यंत सुमारे पावणेदोन लाख किलो मीटरचा प्रवास केला. २००७, २००९ मधील भ्रष्ट मंत्र्यांविरोधातील आंदोलन आणि २०११ ते २०१३ दरम्यान चार वेळा झालेल्या जनलोकपाल आंदोलनातही याच गाडीने अण्णांचं सारथ्य केलं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.