राज ठाकरेंनी आगामी निवडणुकीबाबत घेतला मोठा निर्णय

महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुढील वर्षी होणाऱ्या राज्यातील दहा महानगरपालिकांच्या निवडणुका लढणार आहे.  

Updated: Mar 12, 2016, 01:09 PM IST
राज ठाकरेंनी आगामी निवडणुकीबाबत घेतला मोठा निर्णय title=

नाशिक : महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुढील वर्षी होणाऱ्या राज्यातील दहा महानगरपालिकांच्या निवडणुका लढणार आहे. याबाबतची घोषणा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली.

 

दरम्यान, मनसेच्या प्रचारासाठी आपण स्वतः एप्रिलपासून राज्यभरात दौरे करणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. राज ठाकरे शुक्रवारी नाशिकच्या दौऱ्यावर आले आहेत. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्यासोबत त्यांनी बैठक घेतली. त्यानंतर राज यांनी महापालिका निवडणुकांसदर्भातील पक्षाची भूमिका जाहीर केली.

राज्यात २०१७ला नाशिकसह, मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड आदी दहा महापालिकांच्या निवडणुका आहेत. या सर्व निवडणुका मनसे लढणार असल्याचे ठाकरे यांनी स्पष्ट केले.

मनसेने निवडणुकीची तयारी केलेय. त्यानुसार गटनिहाय मेळावे घेतले जात आहेत. आतापर्यंत पक्षातर्फे मुंबई आणि ठाण्यात मेळावे पार पडले आहेत. राज्यातील अन्य शहरामंध्येही मेळाव्यांना सुरुवात होईल. महापालिका निवडणुकांच्या प्रचारासाठी आपण स्वतः एप्रिलपासून राज्याचा दौऱ्यावर आहोत. सर्व पालिका निवडणुका लढवून पक्षाची ताकद वाढविण्याचा प्रयत्न असेल, राज म्हणालेत. जे काही बोलायचे ते मुंबईतील शिवाजी पार्कवरील पाडव्या मेळाळ्यात बोलू, असे त्यांनी स्पष्ट केले.