तुकोबांच्या पालखीचं आज प्रस्थान...

जगतगुरू संत तुकाराम महाराजांची पालखी आज पंढरीच्या दिशेनं प्रस्थान ठेवतेय.

Updated: Jul 8, 2015, 11:13 AM IST
तुकोबांच्या पालखीचं आज प्रस्थान...  title=

देहू : जगतगुरू संत तुकाराम महाराजांची पालखी आज पंढरीच्या दिशेनं प्रस्थान ठेवतेय.

महाराष्ट्रासाठी वारी हा मोठा आध्यात्मिक सोहळा असतो. भक्तीच मूर्त रूप म्हणजे विठ्ठल आणि आर्त रूप म्हणजे वारी. त्याची तयारीही पूर्ण झालीय.

आज संध्याकाळी चार वाजता तुकोबांची पालखी देहू निघणार आहे. त्यासाठी देहू नगरी आज वारकऱ्यांनी फुलून गेलीय. विठू नामाचा गजर घुमतोय. सारा परिसर आनंदमय झालाय. तुकोबा रायांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याची तयारी आता जवळपास पूर्ण झालीय. यावर्षी वारी युवकांच्या वाढत्या सहभागामुळे अधिक हायटेक असणार आहे. मोबाईलवरही या वारीचा आनंद यामुळे घेता येणार आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.