पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपला न भूतो न भविष्यती असे यश मिळेल. राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱा अजित पवारांच्या गडाला भाजपने यंदाच्या निवडणुकीत मोठा सुरुंग लावला.
पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत भाजपने तब्बल ७८ जागांवर विजय मिळवत एकहाती सत्ता मिळवलीये. तर राष्ट्रवादी काँग्रेसला अवघ्या ३५ जागांवर समाधाना मानावे लागलेय. शिवसेना ९ जागांवर विजयी झालीये. तर अपक्ष ५ आणि मनसेला एका जागेवर यश मिळालेय.
पिंपरी-चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादीला इतक्या मोठ्या फरकांनी भाजप धूळ चारेल असे कोणालाही वाटले नव्हते. पिंपरी-चिंचवडचा हा निकाल अजित पवारांना मोठा धक्का मानला जातोय. या निकालाची कल्पना कदाचित त्यांनीही केली नसेल.
राष्ट्रवादीच्या अनेक दिग्गज नेत्यांना या निवडणुकीत पराभवास सामोरे जावे लागलेय. राष्ट्रवादीच्या महौपाक शकुंतला धऱ्हाडे (राष्ट्रवादी काँग्रेस), राष्ट्रवादीचे माजी महापौर आर एस कुमार यांना पराभवाचा मोठा धक्का बसलाय.