सनी लिऑन विरोधात डोंबिवलीत गुन्हा

अभिनेत्री सनी लिऑन विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. इंटरनेटवर भावना भडकावणारे फोटो आणि व्हिडिओ अपलोड करण्याचा आरोप करण्यात आलाय. अजामीनपात्र गुन्हा असल्याने सनी लिऑनला अटकही होऊ शकते. 

Updated: May 15, 2015, 02:12 PM IST
सनी लिऑन विरोधात डोंबिवलीत गुन्हा title=

डोंबिवली : अभिनेत्री सनी लिऑन विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. इंटरनेटवर भावना भडकावणारे फोटो आणि व्हिडिओ अपलोड करण्याचा आरोप करण्यात आलाय. अजामीनपात्र गुन्हा असल्याने सनी लिऑनला अटकही होऊ शकते. 

डोंबिवलीच्या रामनगर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. सनी लिऑन यांच्या विरोधात माहिती तंत्रज्ञान कायदा (आयटी अॅक्ट) अंतर्गत कलम ६७, कलम ६७ अ नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या कायद्यानुसार अजामिन पात्र गुन्हा असून सनी लिऑनला अटक कधी होणार का हा प्रश्न उपस्थित होत आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.