८९ व्या साहित्य संमेलनाचं सूप वाजलं

पिंपरी चिंचवड मध्ये सुरु असलेल्या ८९ व्या साहित्य संमेलनाच सूप वाजलं… 

Updated: Jan 19, 2016, 09:41 AM IST
८९ व्या साहित्य संमेलनाचं सूप वाजलं

पिंपरी : पिंपरी चिंचवड मध्ये सुरु असलेल्या ८९ व्या साहित्य संमेलनाच सूप वाजलं… 

अतिशय भव्य दिव्य साहित्य संमेलन अशी नोंद झालेल्या साहित्य संमेलनाच्या शेवटच्या दिवशी ही भरगच्च आणि विविध कार्यक्रम होते. विविध परिसंवादाबरोबर चेतन भगत यांची मुलाखत सर्वांच्याच आकर्षणाच केंद्र ठरलं…

'वाचाल तर वाचाल' असा सल्ला देत चेतन भगत यांनी उपस्थितांचं त्यांच्या खास शैलीत मनोरंजन केलं. विविध कार्यक्रमानंतर अखेर समारोपाचा सोहळा ही डोळे दिपवणारा असाच ठरला. 

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, विनोद तावडे, जावेद अख्तर यांच्या उपस्थितीत समारोपाचा हा सोहळा पार पडला. संमेलनात एकूण ९ ठराव मंजूर करण्यात आले. 

प्रत्येकानं संमेलनाच्या आयोजनाचं तोंडभरून कौतुक केलं. जावेद अख्तर यांनी मराठी साहित्याच कौतुक केलं.