वर्धा : वर्धा जिल्हापरिषद व पंचायत समिती निवडणुकी साठी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्धा जिल्ह्यातील आंजी मोठी येथे प्रचार सभा दुपारी ३ वाजता होणार आहे.
या प्रचार सभेत मुख्यमंत्री काय बोलतात याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. ग्रामीण भागाचा विकास, जिल्ह्यात झालेली बंडखोरी, यावर मुख्यमंत्री बोलण्याची शक्यता आहे.
काँग्रेसने गेली १५ वर्ष जिल्हापरिषद मध्ये सत्ता गाजवली मात्र विकास काही केला नाही. अश्यात विरोधकांचा समाचार मुख्यमंत्री या सभेत घेतील.